यावेळी खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसरी लाटेचा धोका लक्षात घेऊन महिला व बाल रुग्णालय परिसरात नवीन दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्लांट प्रति मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करेल. यापूर्वी केंद्र शासनाच्या निधीतून जिल्हा महिला व बाल रुग्णालय परिसरात प्रति मिनिट २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमतेचा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. नवीन दोन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.
००००००००००
६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. यापूर्वी देखील जिल्हा महिला व बाल रुग्णालय परिसरात प्लांट उभारला आहे. आता आणखी दोन प्लांट साकारले आहेत. प्रत्येक प्लांट प्रति मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणार आहे.