000
रेशनकार्डवर धान्य देण्याची मागणी
वाशिम : नवीन रेशनकार्ड असलेल्या लाभार्थींना धान्य मिळत नाही. धान्य देण्याची मागणी वारंवार करण्यात आली; परंतू शासन आदेश नसल्याने धान्य देता येत नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. नवीन रेशनकार्डवर धान्य देण्याची मागणी लाभार्थींनी बुधवारी केली.
00000000000000000000
जऊळका येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे आणखी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ५ मे रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.
००००
दवाखान्याची इमारत शिकस्त
वशिम : कारंजा तालुक्यातील धनज बु. अंतर्गत येत असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत दोन वर्षांपासून शिकस्त झाली आहे. तथापि, या इमारतीच्या दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाही.
000000000000000000
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम: जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. यात बुधवारी शहरालगतच्या जागमाथा परिसरात पोलिसांनी वाहनांची तपासणी केली व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४ चालकांवर दंडात्मक कारवाईही केली.
00000000000000000
रोहित्रात बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, जऊळका, मेडशी परिसरात काही फिडरच्या रोहित्रात बिघाड होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा अधूनमधून खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी बुधवारी केली.
000000000000000
१०० ग्रामस्थांची कोरोना चाचणी
वाशिम : आरोग्य विभागाने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी गावागावात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. यात डोंंगरकिन्ही परिसरातील जवळपास १०० ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली.
000000000000000
ग्रामीण रुग्णालयात सुविधांची मागणी
वाशिम : अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांना पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय उपलब्ध नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकानंी मंगळवारी केली.
00000000000000000
प्रवासी निवारा उभारण्याची गरज
वाशिम : येथील अकोला नाक्यावर एसटीचा थांबा आहे, पण प्रवासी निवारा नाही. तेथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन अकोला नाक्यावर सुसज्ज प्रवासी निवारा उभारण्याची मागणी योगेश उबाळे यांनी बुधवारी बांधकाम विभागाकडे केली.
00000000000000000000
शाळा बंदमुळे आॅटोचालक अडचणीत
वाशिम : कोरोनामुळे गत वर्षापासून शाळा बंद असल्याने आॅटोचालक अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने आॅटोचालकांसाठी एखादे पॅकेज जाहिर करावे, अशी मागणी आशिष दांडगे यांनी बुधवारी केली.