००००
रिठद परिसरातील रस्त्यांची दुरावस्था
वाशिम : रिठद परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. संबधितांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
००००००
किन्हीराजा परिसरातील हातपंप नादुरूस्त
वाशिम : किन्हीराजा जिल्हा परिषद गटातील जवळपास ५ हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हातपंप दुरूस्ती केव्हा होणार? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
००००००
कामरगाव येथे आरोग्य तपासणी
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगााव रेल्वे येथे आणखी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेतली असून, लवकरच त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.
०००००००००००
वाशिम शहरात शुकशुकाट
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यानुसार बाजारपेठ कडकडीत बंद असून, रस्तेही निर्मनुष्य असतात. शुक्रवारी शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
00
अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी
वाशिम : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. हे थांबविण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.