लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: अमरावतीवरून परतूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना चांडस येथे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ व ज्ञानेश्वर जग्गू राठोड दोघेही रा. मळसूर, जि. अकोला अशी मृतकांची नावे आहेत. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्या औरंगाबाद-नागपूर द्र्रुतगती मार्गावरून रविवारी एम.एच.२0 बीएल १७0८ ही राज्य परिवहन मंडळाची बस अमरावतीवरून परतूरकडे जात होती. यावेळी मेहकरकडून मालेगावकडे येणार्या एम.एच. १४ बी.एच. २१६0 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, चांडस गावानजीक सदर दुचाकीची बसला जबर धडक लागली. या अपघातात दुचाकी वाहन पूर्णपणे बसच्या खाली घुसले होते. यामध्ये दुचाकीस्वार सत्यप्रकाश रमेश कंकाळ (२५) रा. मरसूळ, जि. अकोला हा जागीच ठार तर त्याचा मित्र ज्ञानेश्वर जग्गू राठोड (१९) रा. मळसूर ता. पातूर हा गंभीर जखमी झाला होता. जखमीला शिरपूर पोलिसांनी १0८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी वाशिम येथे पाठविले. येथून अकोला येथील रुग्णालयात नेत असताना, जखमी राठोड याचा मृत्यू झाला, अशी माहिती शिरपूर पोलिसांनी दिली. दुचाकीस्वाराने कानात इअर फोन लावलेला होता, असे पोलीस व प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. या अपघातात बस पूर्णपणे रस्त्याच्या कडेला उतरली होती. सुदैवाने बसमधील कुणालाही इजा झाली नाही. अपघाताच्या या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिपणे, पोहेकाँ माणिक खानझोडे, पो.काँ. रमेश मोरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर एसटी बसचे चालक राजू चव्हाण हे स्वत:हून मालेगाव पोलीस स्टेशनला हजर झाले.
बस-दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:52 AM
शिरपूर जैन: अमरावतीवरून परतूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना चांडस येथे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ व ज्ञानेश्वर जग्गू राठोड दोघेही रा. मळसूर, जि. अकोला अशी मृतकांची नावे आहेत.
ठळक मुद्देचांडस फाट्यानजीकची घटना मृतक अकोला जिल्हय़ातील