वाशिम : सरपंच पदाच्या बहुमतासाठी जबरदस्तीने विजयी उमेदवाराची मागणी करण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना तालुक्यातील सुरकंडी खुर्द येथे २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. पोलिसांनी परस्परांविरूध्द गुन्हे दाखल करून आरोपिंना अटक केली. वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथे सरपंच पदासाठी २८ ऑगस्टला निवडणुक होत आहे. या अनुषंगाने एका गटाला सरपंच पदासाठी एका उमेदवाराची आवश्यकता होती. त्यांनी जबरदस्तीने उमेदवाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांनी परस्परांविरूघ्द वाशिम ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. पोलिसांनी कासम चौधरी, यासिम चौधरी, मोहसिन चौधरी, उस्मान चौधरी,हुसेन चौधरी, जावेद चौधरी, जावेद हुसेैन गौरवे, जावेद चंदु गौरवे, हसन भवानीवाले, फिरोज भवानीवाले, फिरोज चौधरी, नजीर चौधरी, अहमद चौधरी व दुसर्या गटातील महम्मद भवानीवाले, सुभान भवानीवाले, जुमला भवानीवाले, आलीम भवानीवाले, असलम भवानीवाले, जुनैद भवानिवाले, अफजल भवानिवाले यांचेविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटातील नऊ आरोपिंना अटक केली असुन न्यायाधिशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार विनायक जाधव यांनी दिली.
सुरकंडी येथे सरपंच पदासाठी दोन गटांत हाणामारी; नऊ आरोपींना अटक
By admin | Published: August 25, 2015 2:28 AM