राजुरा(जि. वाशिम) : येथून जवळच असलेल्या डही फाट्यावर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. मंगळवार, २८ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मालेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले. राजुरा येथील सरपंच इंदू गावंडे यांचा मुलगा नागेश गावंडे (वय २३ वष्रे) व ग्रामपंचायतचे सचिव अमोल राजे हे राजुरा येथील ह्यआमचं गाव आमचा विकासह्ण या उपक्रमाची कार्यशाळा आटोपून दुपारी २ वाजताच्या सुमारास मालेगाव येथे जात होते; तर याचवेळी विरूद्ध दिशेने मेडशी येथील रहिवासी योगेश घुगे (वय २२ वष्रे) हा दुचाकीने येत असताना डही फाट्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात अमोल राजे, नागेश गावंडे आणि योगेश घुगे हे तिघेही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यामध्ये तिघांनाही जबर दुखापत झाली. जखमींना तत्काळ मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ.मुसळे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जखमींची अकोला येथे रवानगी केली. सध्या तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
दुचाकीच्या अपघातात दोन गंभीर जखमी
By admin | Published: June 29, 2016 1:01 AM