मेडशी : आठवडी बाजारात नकली नोटा चालवताना दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यातील २ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दर शुक्रवारी मेडशीचा आठवडी बाजार असतो . शुक्रवारी बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाचाा नोटा देवून लहान व्यापाºयांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला , परंतु एका व्यापाºयाच्या हा प्रकार लक्षात आला असता त्याने इतरांना सांगितले. व्यापाºयानी दोन संशयती आरोपींना आठवडीबाजारालगत असलेल्या पोलिस चौकीमध्ये नेले. येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कॉन्स्टेंबल सुरेंद्र निखीले यांनी त्याची चौकशी व तपासणी केली असता आरोपिंकडून ५० रुपयाचा २९ नोटा अस एकूण १४५० रुपयाच्या नकली नोटा मिळाल्यात. संशयीतांच्या सांगण्यावरुन त्याची नावे प्रतीक बाबराव कांबळे (२५) , दिनेश राजेश देशमुख (२४) आहेत. हे दोघेही पुलगाव कॅम्प वार्ड नं. ३ जि.वर्धा येथील रहिवासी आहेत. यांच्यासह अधिक दोन आरोपी असून ते फरार झाल्याची मािहती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडे चारचाकी वाहन असल्याने पोलिसांनी आपली चक्रे घुमवून नाकाबंदी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वियज एस.महल्ले, पोलिस कॉन्स्टेबल सुरेंद्र तिखीले करीत आहे. बातमी लिहेपयंत पोलिसांची कार्यवाही सुरु होती.
नकली नोटा चालवताना दोन संशयीत ताब्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:34 PM