वाशिम : भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी गाव आत्मनिर्भर असणे आवश्य आहे. ही बाब विचारात घेवून राज्य शासनाने नमो-११ सुत्री कार्यक्रमांतर्गत 'नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यातय आली असून ढोरखेडा आणि घायवळ ही दोन गावे नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव म्हणून विकसीत केली जाणार आहेत.
खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. गाव निवडीबाबतचे निकषही जारी केले होते. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम अभियान किंवा इतर स्पर्धेत जिल्हास्तरावर बक्षिसप्राप्त गावांची निवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हास्तरीय समितीने मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा आणि कारंजा तालुक्यातील गायवळ या दोन गावांची निवड नुकतीच केली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे पाठविला आहे. ही गावे विकसीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अभिसरणाद्धारे निधीची उपलब्धता केली जाणार आहे.
कोणती कामे होणार?समिती मार्फत निवड करण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास आराखात तयार करुन त्याची कालबद्धरित्या अंमलबजावणी केली जाईल. सर्व समावेशक कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामख्याने गरजूंना पक्के घर बांधून देणे, रस्ते, रोजगार, कृषी व कृषी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधणे, सेंद्रीय शेतीसाठी साह्य व बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, उत्पादनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, सौर व हरित उर्जेचा वापर करणे, यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करणे आदी बाबीचा आराखड्यात समावेश करुन त्यानुसार येत्या काळात कामे केली जाणार आहेत.