वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र शासनाने बाळगले आहे. त्यास अनुसरून सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता या बाबी विचारात घेऊन राज्यात गटशेतीस शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्यात येत आहे. या योजनेला ९ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.दिवसागणिक वाढत चाललेली लोकसंख्या व जमिनीचे पडत चाललेले तुकडे या कारणांमुळे वहिती जमिनीचे प्रती खातेदार क्षेत्र कमी झाले आहे. परिणामी, शेतकºयांना शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासी झाली आहे. दरम्यान, शेतकºयांना शेती करणे परवडावे, यासाठी गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देऊन त्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेला आता ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.गटशेती करण्यासाठी सामूहिकरित्या एकत्र येत असलेल्या शेतकºयांना शासनाकडून भरीव मदत केली जात आहे. त्यामुळे या योजनेस शेतकºयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता मुदतवाढ मिळाल्याने वंचित राहिलेले शेतकरीही योजनेत सहभागी होऊ शकतील.- डी.के.चौधरीउपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम
गटशेतीस प्रोत्साहन योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 4:27 PM