लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाची अनियमितता शे तकर्यांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकर्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधी तदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकर्याला एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकर्यांचे बजेट कोलमडत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर लागवड खर्चही वसूल हो त नसल्याची परिस्थिती आहे. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शे तकर्यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
उडदाच्या एकरी उत्पादनात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:24 AM
यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त अल्प पावसाचा फटकालागवड खर्चही वसूल होईना