----
पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय
वाशिम : जिल्ह्यातील शिरपूरसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासह साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.
--------------
इंझोरी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पृष्ठभूमीवर उंबर्डा बाजारसह परिसरातील काही गावांत कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
-------------------
शिरपूर येथे पोलिसांची संख्या अपुरी
वाशिम : पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत ३५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कामरगाव चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
-------------
मान्सूनपूर्व कामाअभावी गावांत अस्वच्छता
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतील मान्सूनपूर्व कामे करण्याच तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.
^^^^
जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना
वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
------------
धानोरा ते कुंभी रस्त्याची दुरवस्था
वाशिम : आसेगाव : मंगरुळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभी पर्यंतच्या अंतरातील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असून, यातून एखादे वेळी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--------
फवारणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : जिल्ह्यातील कामरगाव येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. गत १० जुलैपासून हा उपक्रम सुरू आहे. कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
-----------
एकाच दिवशी चार सापांना जीवदान
वाशिम : निसर्ग स्पर्श फाउंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी गुरुवारी नाग आणि मन्यार या विषारी सापांसह एकूण चार सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. आदित्य इंगोले, सुबोध साठे, विठोबा आडे, शुभम सावळे, शिवा भेंडे, श्रीकांत डापसे यांनी हे साप पकडले.
------------