वाशिम: गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव ऐन ऊसतोडणीच्या हंगामात वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडत असून, कारखान्यांसह व्यापाºयांकडून ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसविक्रीचा परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यात ऊसाचे क्षेत्र ११३ हेक्टर पेक्षा अधिक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही मिळत असे; परंतु गतवर्षी ऊस तोडणीवर आला असतानाच देशात कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाला. त्यामुळे ऊसाचे उभे पीक शेक डो शेतकºयांच्या शेतातच सुकले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना कवडीचाही मोबदला शासनाकडून मिळाला नाही. त्यानंतर कोरोना संसर्गाचा वेग मंदावला स्थिती पूर्ववत होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊसाच्या पिकासाठी तयारी केली. सिंचनासह विविध बाबींवर लाखोचा खर्चही केला. त्यामुळे ऊसाचे पीक चांगले बहरले. आता हा ऊस तोडणीवर आला असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग उफाळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटून आले असून, कारखान्यांसह व्यापाऱ्यांकडूनही ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसाची विक्री परडवत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्या आहेत. यातून भरघोस उत्पन्न त्यांना मिळत आहे.
------------------------
कोरोना संसर्गाचा व्यवसायावर परिणाम
जिल्ह्यात ऊस उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भरवशावर शेक डो लोक रसवंतीचा व्यवसाय करीत होते; परंतु गतवर्षी कोरोनामुळे रसवंत्यांसह शितपेय विक्रीचा व्यवसाय ऐन हंगामात पूर्णपणे बंद राहिला, तर आताही कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शहरातील शितपेयाच्या दुकानांकडे ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. त्यात सायंकाळच्यानंतर या दुकानांकडे ग्राहक येतात; परंतु सायंकाळी ५ नंतर प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्यास मूभाच नसल्याने जिल्ह्यातील शितपेय विक्रेते अडचणीत सापडल्याने त्यांना ऊसाची खरेदी करणेही परवडणारे राहिले नाही.
---------------
ऊसाचे तालुकानिहाय क्षेत्र
तालुका क्षेत्र
वाशिम १५.८०
रिसोड ७२.५०
मालेगाव ११.७०
मं.पीर ११.००
कारंजा ०२.००
मानोरा ०००
--------
कोट: गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने ऊसाची विक्रीच होऊ शकली नाही. आता यंदाही ऐन ऊस तोडणीवर आला असताना कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याने स्वत:च महामार्गावर शेतालगत रसवंती सुरू केली आहे. या ठिकाणी दिवसभरात अनेक वाहनचालक ताजा रस पिण्यास येतात. त्यामुळे चांगले उत्पन्न होत आहे.
-तुकाराम पवार,
ऊस उत्पादक शेतकरी
------------
कोट: गतवर्षी लॉकडाऊन काळात शेतातील उभे ऊसाचे पीक सुकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊस खरेदी करीत आहेत. त्यांना ऊस विकून नुकसान करण्यापेक्षा स्वत:च रसवंतीचा व्यवसाय करणे योग्य वाटले आणि हा पर्याय आता बºयापैकी नफा मिळवून देत आहे.
-घनश्याम वाघ,
ऊस शेतकरी
===Photopath===
090321\09wsm_2_09032021_35.jpg
===Caption===
ऊसाचे उभे पीक