कायम शब्द वगळलेल्या अघोषित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शाखा, तुकड्यांसह नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचे मूल्यांकनाचे प्रस्ताव एकत्रितरीत्या एप्रिल २०२१-२१ मध्ये सादर करण्याचे निर्देश यापूर्वीच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तथापि, वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शाखा, वर्ग तुकड्या, नैसर्गिक वाढीच्या तुकड्या आदींचे अनुदान मूल्यांकनाचे प्रस्ताव शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्यापही सादर केलेले नाहीत. या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे परिपूर्ण प्रस्ताव ३१ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी १ एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास तीन प्रतीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
-----------
..तर शाळा ठरतील स्वयं अर्थसहाय्यित
शासनाच्या पत्रानुसार अघोषित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचे मूल्यांकनाचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम संधी असून, निर्धारित वेळेनंतर आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, तसेच संबंधित शाळा, शाखा तुकड्यांना स्वयं अर्थसहाय्यित समजण्यात येणार असून, याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजीच्या पत्रात स्पष्ट केले आहे.