वाशिम - राज्यभरातील काही शासकीय कार्यालये, विश्रामगृृहांत वातानुकूलन यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवण्यात येत असल्याने विजेचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच त्याचा आर्थिक भूर्दंड शासनाला बसत असल्याची बाब समोर आली आहे. या पृष्ठभूमीवर वातानुकूलन यंत्रणा २४ डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवण्याचे निर्देश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला २४ आॅगस्टला दिले. त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील विश्रामगृहे तसेच शासकीय कार्यालयांत वातानुकूलन यंत्रणा २४ डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवावी अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.शासकीय कार्यालयांत बऱ्याच ठिकाणी वातानुकूलन यंत्र, यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवण्यात येते. या प्रकारामुळे विजेचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच याचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आली आहे. वातानुकूलन यंत्र, यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवले जात असल्याने ऊर्जा निर्माण करणाºया स्त्रोतांचा वापर अधिक प्रमाणात होऊन पर्यावरणाला काही प्रमाणात हानी पोहचत आहे. वातानुकूलन यंत्रणा २४ डिग्री सेल्सिअस तापमानावर वापरली तर २४ टक्के विजेची बचत होऊ शकते तसेच सदर तापमान हे मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेचे अभिसरणाकरीता सर्वोत्तम मानले जाते, यावर केंद्र सरकारच्या ब्युरो आॅफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे (बीईई) शिक्कामोर्तब करण्यात आले.यापुढे शासकीय कार्यालये, विश्रामगृहे तसेच इतर इमारतींमधील सर्व वातानुकूलन यंत्रे तसेच यंत्रणेचे तापमान २४ डिग्री सेल्सिअस ठेवण्यात यावे, अशा सूचना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विभाग व जिल्हास्तरीय बांधकाम विभागाला दिल्या आहेत.शासकीय कार्यालये, विश्रामगृहांत वातानुकूलन यंत्रणा २४ डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवण्याच्या वरिष्ठांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल. सर्व संबंधितांना यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.- सुनील कळमकरकार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम.