लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश दिला जातो. यंदा मात्र बदललेल्या शासकीय धोरणांमुळे शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना गणवेशांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यासंबंधीच्या तरतुदींमध्ये बदल करीत यावर्षीपासून थेट गणवेश न पुरविता यासाठी लागणारी रक्कम विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील काही पालकांनी बँकांमध्ये संयुक्त खाते उघडले तर काही पालकांनी अद्यापही खाते उघडले नाही. एका गणवेशासाठी २00 रुपये मिळणार आहे. प्रति विद्यार्थी दोन गणवेशांसाठी एकूण ४00 रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. गणवेश खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या ७७३ आणि नगर परिषदेच्या ४५ अशा एकंदरीत ८१८ शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात २.५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. विद्यार्थी व पालकाच्या संयुक्त बँक खात्यांचे विवरण, आधार कार्डसह इतर कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही र क्कम जमा केली जाणार आहे. जिल्हय़ात जवळपास ८३ हजार विद्यार्थी हे गणवेशासाठी पात्र आहेत. ४0 टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते प्राप्त असून, अद्याप ६0 टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या ८१८ शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याकरिता मुख्याध्या पकांच्या खात्यात २.५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. संबंधित पालकांनी यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात ४00 रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
बँक खात्याअभावी गणवेशाचा तिढा कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:40 AM
वाशिम: जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश दिला जातो. यंदा मात्र बदललेल्या शासकीय धोरणांमुळे शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना गणवेशांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
ठळक मुद्देअडीच कोटी रुपयांचा निधी पडून तोडगा कधी निघणार?