निलेश सोमाणी यांचा पुढाकार
वाशिम : विदर्भभूषण केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक कार्यकर्ते, तरुण क्रांती मंच, भारतीय जैन संघटना, भारतीय गो क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या पुढाकारातून वाशिम जिल्ह्यासाठी १७ जून रोजी आणखी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत केली आहे. गडकरी यांनी आजवर जिल्ह्यासाठी १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत.
नामदार नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या संकट काळात सामाजिक उपक्रमावर भर देत संपूर्ण देशात लोकांना मदतीचा हात दिला आहे. प्रत्येक माणसाचा जीव वाचला पाहिजे, या भावनेतून त्यांनी वाशिम जिल्ह्यासह विदर्भात अनेक सरकारी व खासगी हॉस्पिटलसोबत सामाजिक संघटना यांना व्हेंटिलेटर, बायपॉप मशीन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत केली आहे. वाशिम जिल्ह्यातील गरजवंतांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, याकरिता निलेश सोमाणी यांनी संपर्क साधून पाच ऑक्सिजनकॉन्सन्ट्रेटरची मागणी केली होती. अवघ्या २४ तासाच्या आत गडकरी यांनी ही मागणी पूर्ण करीत गुरुवारी १७ जून रोजी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी सदर पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्या. सोमाणी यांचे बंधू राजेश सोमाणी व श्याम सोमाणी यांना या मशीन नामदार गडकरी यांच्या निवासस्थानी देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यास १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व एक व्हेंटिलेटर मशीन गडकरी यांनी आजवर दिले आहे.
जिल्ह्यातील गरजवंतांना सदर ऑक्सिजन मशीन नि:शुल्क उपलब्ध करण्यात येणार असून गडकरी यांच्या प्रेरणेतून वाशिम येथे ऑक्सिजन बँक ही जनसुविधा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती निलेश सोमाणी यांनी दिली आहे.