लोकमत न्यूज नेटवर्कवाकद : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या वाकद येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. २ आॅक्टोबर रोजी हा स्वागत समारोह झाला असून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.वाकद येथील धनंजय भगवानराव देशमुख हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ३० सप्टेंबर रोजी ते नाशिक येथे सेवानिवृत्त झाले. २ आॅक्टोबर रोजी ते आपल्या मूळ गावी वाकद येथे येणार असल्याने गावकºयांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. वाकद येथील बसस्थानकावर आगमन होताच शिवम मित्र मंडळ, शिवाजी विद्यालय वाकद,गावातील नागरीक, व्यावसायीक, शाळा ,महाविद्यालय ग्रा.पं.कार्यालय, विविध संघटना,अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत केले. तेथुन ढोल, ताशे व बँड पथकाच्या गजरात राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. गल्लोगल्ली गावातील महिलांनी रांगोळी काढुन औक्षण करीत स्वागत केले. याच कार्यक्रमादरम्यान देशमुख परिवार वाकदच्यावतीने वाकद व परिसरातील आजी माजी सैनिकांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक संपत जमधाडे, पांडूरंग लाटे, नारायण मोरे, प्रकाश लाटे, वामन अंभोरे, चंद्रपालसिंह ठाकुर, अशोकराव देशमुख, सलमातखॉ, पठाण, प्रल्हाद बोरकर, बळीराम गांधीले, आजी सैनिक लखन चोपडे, पंजाबराव देशमुख, केंद्रेकर, यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.अभिजीत देशमुख यांनी केले. गावकºयांच्यावतीने झालेला अनोखा सत्कार पाहून धनंजय देशमुख भारावून गेले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरचे माझे जीवन गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करीन, असे सांगितले. कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन ह.भ.प.अशोक अस्तरकर यांनी तर आभार प्रा.संजय देशमुख यांनी मानले.
सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 4:28 PM
वाकद : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या वाकद येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.
ठळक मुद्देवाकद येथील धनंजय भगवानराव देशमुख हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ३० सप्टेंबर रोजी ते नाशिक येथे सेवानिवृत्त झाले. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावकºयांच्यावतीने झालेला अनोखा सत्कार पाहून धनंजय देशमुख भारावून गेले.