लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पूर्णपणे मिळत नाही; तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नववर्षातही हजेरी लावून शेतकऱ्यांना गारद केले आहे.सन २०१९ या वर्षात शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागला. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. दोन टप्प्यात हा निधी मिळाला असून, अजून संपूर्ण शेतकºयांच्या बँक खात्यावर मदत निधी जमा झाला नाही. अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने २ जानेवारीच्या पहाटे जिल्ह्यात हजेरी लावून शेतकºयांना गारद केले आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर, उमरा, देगाव, जवळा परिसरात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अनसिंग परिसरातील देगाव येथे मोठया प्रमाणात गारपिटसह वादळी पाऊस झाला. गहू, तुर, कपाशी, कांदे, इतर भाजीपाला, फळबागेचे अतोनात नुकसान झाले. शेतातील इतर झाडांची पडझड झाली. देगाव येथील शेतकरी संदीप चव्हाण, भिकाजी येवले, नवीन येवले, किशोर वारकड, विष्णु भवानसिंग, चव्हाण, वसंता भवानसिंग चव्हाण, मुंगराम किसन राठोड, किसन भवानसिंग चव्हाण, मधुकर जाधव, शंकर रामचंद्र राऊत, रामधन जाधव, जयसिंग जाधव, रामा राठोड, ज्ञानदेव चौधरी, फकीरा वारकड यांच्यासह अनेक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. वारा जहॉगीर येथील दत्ता नारायण इंगलकर, अमोल आनंद ढगे यांच्यासह १०० ते १५० शेतकºयांच्या शेतातील गव्हू पिकाची नासाडी झाली आहे. उमरा येथील १५० ते २०० शेतकºयांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातही वादळीवारा व अवकाळी पावसामुळे फळबागेसह गहू, हरभरा, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यातील वटफळ, रुई गोस्ता, शेंदुरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह १० ते १५ गावांत अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. ाारपीट झाली. कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.(प्रतिनिधी)