लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १३ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरीकडे परराज्य तसेच परजिल्ह्यातून आलेले कामगार, मजूर हे ‘होम क्वारंटीन’ म्हणून अनेक ठिकाणी शेतात राहायला गेले होते; त्यांचीही वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे धांदल उडाली.यावर्षी मार्च तसेच एप्रिल महिन्यातही अवकाळी पाउस व गारपिट झाल्याने फळबागेचे तसेच गहू, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. लॉकडाउन व संचारबंदीमुळे फळबाग उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत असताना अवकाळी पावसाने यामध्ये भर टाकली. १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळवाºयासह अवकाळी पाउस आल्याने बाजार समितीच्या ओट्याखाली ठेवण्यात आलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाशिम बाजार समितीने भिजलेला शेतमाल १४ मे रोजी मोजून घेतला. परंतू, बाजारभाव काय मिळेल, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या ओट्यावर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जातो. व्यापाºयांचा शेतमाल हटवून तेथे शेतकºयांच्या शेतमाल ठेवण्यात यावा, या मागणीसाठी यापूर्वी विविध शेतकरी संघटना, शेतकरी तसेच राजकीय नेत्यांनीदेखील आंदोलने केली होती. या आंदोलनानंतर काही दिवस ओट्यावरील व्यापाºयांचा शेतमाल हटविला जातो. त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. १३ मे रोजी अवकाळी पाऊस झाल्याने बाजार समित्यांच्या ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने शेतकºयांच्या शेतमाल ओट्याखाली ठेवण्यात आला. पावसामुळे हा शेतमाल भिजल्याने शेतकºयांना नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बाजार समिती प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.दरम्यान, वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे, चिखली बु. परिसरात पपईच्या बागेचे अतोनात नुकसान झाले. कार्ली परिसरात आंबे, फळबागेचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परजिल्हा, परराज्यात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर परतले आहेत. गांगलवाडीसह २० ते २५ गावातील शेतशिवारात अनेकांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. वादळी पावसामुळे या नागरिकांची एकच धांदल उडाली. झोपडीत पाणी शिरल्याने अनेकांनी गैरसोयीचा सामना करावा लागला.
वाशिम येथे भिजलेल्या शेतमालाची मोजणी१३ मे रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे वाशिम बाजार समितीच्या ओट्याखाली असलेला शेतमाल भिजला. यावेळी शेतमाल वाचविण्यासाठी शेतकºयांची एकच धावपळ सुरू होती. परंतू, पावसाचा जोर अधिक असल्याने बºयाच शेतकºयांचा शेतमाल भिजला. हा शेतमाल १४ मे रोजी मोजून घेण्यात आला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे यांनी दिली.सर्वेक्षणाच्या सूचनाअवकाळी पावसामुळे फळबागेचे नुकसान झाल्याने कृषी विभागाने तातडीने शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, पंचनामे शासनाकडे पाठवावे, अशा सूचना जि.प. कृषी सभापती विजय खानझोडे यांनी १४ मे रोजी दिल्या.