राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोटान विंगची बैठक मानोरा येथे नुकतीच पार पडली. त्यामधे प्रा. बदरके बोलत होते.
सरकार प्रोविडेंट फंडाची गुंतवणूक कर्मचारी भविष्य निधी संघटन या सरकारी यंत्रणेत करीत नाही, तोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. तसेच ज्यांना पेन्शन सुरु आहे त्यांचेही पेन्शन धोक्यात येईल, म्हणून आपण पहिली मागणी केली पाहिजे की, प्रोविडेंट फंडाची खासगी क्षेत्रातील गुंतवणूक थांबवून केवळ इपीएफओमधे करावी, असे ते म्हणाले. यावेळी संजय ढळे यांनी मनोगत व्यक्त करून कर्मचारी यांनी नोंदणीकृत असलेल्या ट्रेड युनियन आरएमबीकेएसमधे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी उत्तम सोळंके, संजय भवाळ, सुभाष मोरकर, गोपाल तडसे, दिलीप अंबोरे, सुरेश इंगळे, प्रा. कैलास कांबळे, संदीप सावळे, गजानन भोरकडे, आनंदा खुळे, चिंतामन कळंबे, बलवंत साखरकर, संजय व्यवहारे आदी उपस्थित होते.