शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

अवकाळी पाऊस, गारपीटीचे थैमान सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:39 AM

तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकºयांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे ...

तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकºयांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट सुरूच असून नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानाचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ३९ गावांमध्ये १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २१२३ शेतकरी बाधीत झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ४० गावांमध्ये ११७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १८६१ शेतकरी बाधीत झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २० गावांमध्ये १६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

..........................

रिसोड तालुक्यात बिजवाई कांदा, टरबुजाचे प्रचंड नुकसान

रिसोड तालुक्यात २१ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे बिजवाई कांदा, टरबुजाचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पळसखेड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांच्यासह महसूल विभागाला याबाबत अवगत केले. त्यावरून २२ मार्च रोजी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी पळसखेड येथे जाऊन नुकसानाचे पंचनामे केले.

...................................

बॉक्स :

गारपिटीने तालुकानिहाय झालेले नुकसान

वाशिम - बाधित गावे - ३९ - बाधित क्षेत्र १६९३ हे.

मालेगाव - बाधित गावे - ४० - बाधित क्षेत्र ११७० हे.

रिसोड - बाधित गावे - २० - बाधित क्षेत्र १६८४ हे.

मंगरूळपीर - बाधित गावे - २२ - बाधित क्षेत्र ५०९ हे.

मानोरा - बाधित गावे - १७ - बाधित क्षेत्र ८६५ हे.

कारंजा - बाधित गावे - ०४ - बाधित क्षेत्र ०५ हे.