गव्हा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन ऊर्फ मखराम पवार या व्यक्तीने हरितक्रांतीचे प्रणेते, पुरोगामी महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेल्या महानायक वसंतराव नाईक यांचा प्रचंड आस्थेने आणि प्रेमापोटी आपल्या घरासमोर अर्धाकृती पुतळ्याची निर्मिती मागील अनेक वर्षांपूर्वी केलेली होती.
अल्पभूधारक, सामाजिक कार्यकर्ते मखराम पवार यांची नाईक साहेबांविषयी असलेली तळमळ पाहून मानोरा तालुक्यातील काही गणमान्य व्यक्तींनी वसंतराव नाईक स्मारक समितीची स्थापना मागील काही महिन्यांपूर्वी करून पुतळ्याचे प्रलंबित कामे पूर्ण करून महंत संजय महाराज, जितेंद्र महाराज, अ. भा. गोर बंजारा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, डॉ. प्रा. विजय जाधव, नामा जाधव, अरुण राठोड, प्रा. जय चव्हाण, मनोहर राठोड आणि विविध क्षेत्रातील गणमान्यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.