शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २ लाखांपर्यंत कर्जमाफीतून ७०८ शेतकऱ्यांचे संमतीपत्र बोगस बनवून पुनर्गठन केले, अशांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी द्यावी,
वाशिम जिल्ह्यात कोणत्याच तालुक्यात सहकारी बाजार समितीमड्ये अडत घेतली जात नाही. फक्त मानोरा येथील सहकारी बाजार समितीमध्ये
अडत घेतली जाते, ती बंद करावी.
भाजीपाला मार्केटमध्ये १० टक्के अडत घेतली जाते ती ५ टक्के करावी, शेतकऱ्यांचे वाढीव वीज बिल कमी करून कापलेले शेती वीज कनेक्शनची जोढणी करावी, या मागण्यांकरिता हे आमरण उपोषण आहे. तरी या आंदोलनात शेतकरी, समितीचे पदाधिकारी यांनी कोरोना नियमाचे पालन करीत सहभागी व्हावे, असे आवाहन कारंजा- मानोरा संघर्ष समितीचे देवराव राठोड (नाईक), डॉ. संजय रोठे, गजानन राठोड, प्रा. जय चव्हाण, मनोज खडसे, मुंगसीराम उपाधे, दीपक ठाकरे, प्रकाश चक्रनारायण, प्रा. टी. व्ही. राठोड, हंसराज शेंडे, दयाराम गव्हाणे, डॉ. अशोक करसडे यांनी केले आहे.