ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २१- पारंपरिक उर्जेचे स्त्रोत म्हणून पेट्रोल व डिझेलची विक्री करणा-यांकडून सौर उर्जेसारख्या अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र वाशिम येथील पाटणी पेट्रोलपंपवर पाहायला मिळत आहे.
अलिकडच्या काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाण्यापासून तयार होणारी आणि कोळशापासून तयार होणारी विज, असे दोन मुख्य प्रकार विजेचे आहेत. हे दोन्ही प्रकार पारंपरिक उर्जेचे आहेत. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल हे सुद्धा पारंपरिक उर्जेचे स्त्रोत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पारंपरिक उर्जेचे मुख्य स्त्रोत असलेली महावितरणची विज यंत्रणा बंद पडली किंवा ती जेथे पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलचा वापर होतो. अर्थात या दोन्ही पदार्थांचा सर्वाधिक वापर हा वाहने चालविण्यासाठीच होतो. त्यामुळेच पारंपरिक उर्जेचे स्त्रोत म्हणून ओळखल्या जाणाºया पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीसाठी पेट्रोलंपपाची संकल्पना अस्तित्वात आहे. आता ज्या ठिकाणी पेट्रोल व डिझेलसारख्या पारंपरिक उर्जास्त्रोताची विक्री केली जाते. त्याच ठिकाणी आपल्या व्यवसायात अडथळा नको म्हणून वाशिम येथील एका पेट्रोलपंपवर चक्क सौर उर्जेचा वापर केला जात आहे. त्या ठिकाणी वीजपुरवठा नसताना या सौर उर्जेचा वापर केला जातो. साधारण आठ ते दहा तास सौर उर्जेचा प्लांट काम करीत असल्याचे पेट्रोलपंपवरील कामगारांकडून सांगण्यात आले. आता ज्या ठिकाणी पारंपरिक उर्जेचा स्त्रोत विकला जातो. त्याच ठिकाणी विके्रता स्वत: अपारंपरिक उर्जेचा वापर करतो, ही बाब निश्चितच अनेकांना विचित्र, आश्चर्यकारक वाटणारी असली तरी, त्यामुळे सौर आणि पवणन उर्जेसारख्या अपारंपरिक उर्जेला किती महत्त्व आहे, तेसुद्धा स्पष्ट होते.