लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: परिसरात गुरांवर होत असलेल्या घटसर्प आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशूधन विभागाकडून सोमवारी लसीकरण करण्यात आले. यासाठी चक्क खाजगी व्यक्तींचा आधार घेण्यात सोमवारी दिसून झाले. लोकमतनेच २३ जुलैच्या अंकात ‘घटसर्प’मुळे १४ गावांमधील गुरांचे आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल पशूधन विकास अधिकाºयांनी घेत पशूधन पर्यवेक्षकांना तातडीने लसीकरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे १४ गावांतील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच या परिसरात २ वर्षांपासून पशूसंवर्धन विभागाकडून कुठल्याच प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही आणि पशूवैद्यकीय अधिकारीही फिरकले नाहीत. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाºयावर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. इंझोरी परिसरात आता सततच्या पावसामुळे गुरांवर विविध आजारांची लागण होत असून, त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने या परिसरातील १४ गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंझोरी, चौसाळा, धानोरा, भोयणी, नायणी, खापरी, खंडाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, अजनी, जामदरा, तोरणाळा, उंबर्डा, म्हसणी आदि गावांतील गुरांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. काही गुरे आजार बळावल्यामुळे दगावण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच पशू संवर्धन विभागाकडून दखल न घेण्यात आल्याने पशूपालकांत संतापाची लाट उसळली होती. या पृष्ठभूमीवर लोकमतने २३ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले. याची दखल मानोराच्या पशूधन विकास अधिकाºयांनी घेतली आणि इंझोरी परिसरातील गुरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या कोंडोली येथील पशू वैद्यकीय दवाखान्याच्या पशूधन पर्यवेक्षकांना लसीकरण राबविण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार पशूधन पर्यवेक्षकांनी लसीकरण मोहिमेची तयारीही केली. परंतु या कामासाठी त्या स्वत: न येता त्यांनी चक्क खाजगी व्यक्तींना पाठविले. या व्यक्तीने गावात फिरुन गुरांना आजार प्रतिबंधक लसही दिली. शासकीय कर्मचारी जबाबदारी सोडून खाजगी व्यक्तींचा आधार घेण्याचा हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)
शूधन विकास अधिकाºयांच्या सुचनेनंतर इंझोरीसह परिसरातील गुरांवर लसीकरण मोहिम राबविण्यासाठी काही लोकांना पाठविले होते. तेथे गुरांवर योग्यरित्या लसीकरण करण्यात आले व इतर उपचारही करण्यात आले आहेत. -डॉ. किरण जाधव, पशूधन पर्यवेक्षक, कोंडोली (मानोरा)