शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 3:36 PM

वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे. यामुळे कामाचा दर्जा खालावणार असून, कंत्राटदार नियमांचे उल्लंघन करीत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात कारंजा-मेहकर, वाशिम-हिंगोली, कारंजा-वाशिम आणि मानोरा-महान, यादरम्यान चार राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या कामाचा प्राथमिक टप्पा म्हणून समतलीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या प्रक्रियेंतर्गत ४० टक्क्यांहून अधिक काम आटोपत आले आहे. हे काम करीत असताना रस्ता मजबूत व्हावा म्हणून गौण खनिज असलेल्या मुरूमाचा वापर करणे आवश्यक आहे. या गौण खनिजाची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याबाबत कंत्राटदार कंपन्यांना निर्देशही देण्यात आले आहेत. तथापि, जिल्ह्यातील मानोरा-मंगरुळपीर आणि वाशिम-मंगरुळपीर दरम्यान होत असलेल्या कामांत नियमांचे उल्लंघन होत आहे. कंत्राटदार कंपन्या मुरुमाऐवजी थेट मातीचा वापर समतलीकरणासाठी करीत आहेत. यामुळे मार्गाचा दर्जा खालावणार आहे. त्यातही ही माती रस्त्यालगतच खोदकाम करून वापरण्यात येत असल्याचे दिसत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग