लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : कमी क्षेत्रफळात विक्रमी उत्पन्न घेण्याची कामगिरी सावरगाव लगतच्या मथुरा तांड्यातील शेतकरी अज्ञातराव बरडे यांनी केली आहे. रबी ज्वारीच्या पिकात हरभºयाची पेरणी त्यांचा अफलातून प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव लगतच मथुरा तांडा आहे. येथील शेतकरी अज्ञातराव बरडे यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर शेती आहे. शिवारालगतच असलेल्या तलावाच्या आधारे सिंचन करून ते वेगवेगळी पिके घेतात; परंतु अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येत असल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक वेगळाच प्रयोग शेतीत केला. त्यांनी तीन वर्षांपूर्वी चार एकरापैकी अडिच एकर शेतीत रबी ज्वारीची पेरणी केली आणि याच ज्वारीत एक ओळही न सोडता अगदी ज्वारीच्या धांड्याला लगत हरभºयाची पेरणी रब्बी हंगामात केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले. तथापि, गतवर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने त्यांना हा प्रयोग करता आला नाही; परंतु यंदा त्यांनी पुन्हा हा प्रयोग केला असून, हरभºयाचे पीक चांगलेच बहरले आहे. या पिकातून त्यांना विक्रमी उत्पादन होण्याचा विश्वास आहे. विशेष म्हणजे ज्वारीच्या पिकातच हरभºयाची पेरणी करताना जमीन तयार करणे कठीण होत असले तरी, त्यांच्या खर्चात मात्र बचत झाली. वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून पीक सुरक्षीत रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा या पिकांत माकडे, हरीण या प्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. अज्ञातराव बरडे यांनी मात्र ज्वारीच्या पिकातच हरभरा पेरला असल्याने या वन्यप्राण्यांपासून हरभºयाची आपोआपच सुरक्षा झाली आहे. त्यातच कमीअधिक थंडीचा आणि वातावरणातील इतर बदलाचाही या पिकाला फटका बसत नाही. त्यातच वातावरणातील बदलामुळे मोकळ्या शिवारात किडींचा अधिक प्रादूर्भाव होत असताना ज्वारीच्या पिकातील हरभरा मात्र किडीपासूनही सुरक्षीत आहे.
रबी ज्वारीच्या पिकात हरभऱ्याच्या पेरणीचा अफलातून प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 3:30 PM