लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रा. प. महामंडळाचे (एसटी) महाव्यवस्थापक (वाहतूक) यांचे आदेश डावलत लिपिक कमतरेचे कारण समोर करून वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक या कामगारांकडून विशिष्ट मासिक हप्ता घेऊन त्यांचा इतरत्र वापर करीत महामंडळाची आर्थिक हानी करून लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार अकोला विभागातील वाशिम आगारात घडला आहे. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारही करण्यात आली आहे.एसटी महामंडळातील विविध विभागांतर्गत कार्यरत वाहतूक नियंत्रक, वाहक, चालक यांचा इतरत्र वापर करू नये, असे परिपत्रक एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी जारी केले आहे. तथापि, या परिपत्रकातील आदेशाची अधिकाऱ्यांनी पायमल्ली करून एसटीच्या अकोला विभागातील वाशिम आगारात लिपिक कमतरतेचे कारण समोर करून डीओर, एबीसी, कॅश अॅण्ड इश्यूसह इतर कामांसाठी वाहतूक नियंत्रक, वाहक, चालक आदि कामगारांचा अवाजवी वापर करून गैरप्रकार करीत एसटी महामंडळाची लाखो रुपयांची हानी केल्याचा प्रकार घडला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. यात २ मे २०१९ ते १७ मार्च २०२० पर्यंत ११ महिन्यांच्या कालावधित एकूण २६६ चलनीय कर्मचाºयांचा अवाजवी वापर करून महामंडळाचे ६८ लाख ४ हजार ९१३ रुपये वेतनापोटी अधिकाºयांनी खर्ची घातले आहेत. या प्रकरणी अकोला येथील विजय मालोकार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली आहे.वेतनातील ३० टक्के रकमेच्या बोलीवर कर्तव्यवाहतूक नियंत्रक, वाहक, चालकांना इतरत्र वापर करण्यावर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांचे आदेश असताना वाशिम आगारातील अधिकाºयांनी वरिष्ठांच्या सहकार्याने आपल्या मर्जीतील कर्मचाºयांचा वापर करून महाव्यवस्थापकांच्या आदेशाची पायमल्लीच केली नाही, तर या कर्मचाºयांकडून वेतनातील ३० टक्के रक्कम घेतल्याची चर्चा आगारातील काही कर्मचाºयांत होत असून, त्यासाठी विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतुक अधिकाºयांनी वेळोवेळी वाशिम आगाराला भेटी दिल्याचीही चर्चा कर्मचाºयांत आहे.
वाशिम आगारात कर्मचाºयांचा तुटवडा असताना आवश्यकतेनुसार कर्मचाºयांना जबाबदारी देण्यात आली. कुठलाही गैरप्रकार करण्यात आलेला नाही. तथापि या प्रकरणाची चौकशी होवून सत्य समोर येईलच. त्यामुळे आम्ही सध्या याबाबत अधिक काही सांगू शकणार नाही.- विनोद इलामे,आगार व्यवस्थापक, वाशिम