०००००
३० तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही
वाशिम : रिसोड तालुक्यातील ३० तलाठ्यांना कार्यालयासाठी अद्याप स्वतंत्र जागा व इमारत मिळाली नाही. भाड्याच्या खोलीतून कामकाज करावे लागत आहे. स्वतंत्र कार्यालयासाठी निधी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.
०००००
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी
वाशिम : सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे अन्याय असून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक हरीश चौधरी यांनी शनिवारी केली.
००
कृषिपंपजोडणी देण्याची मागणी
वाशिम : कृषिपंप जोडणीसाठी रिसोड तालुक्यातील जवळपास ८०० शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज दिले होते. यापैकी जवळपास ४०० शेतकऱ्यांना अद्यापही कृषिपंपजोडणी मिळाली नाही. किमान पुढच्या रब्बी हंगामात तरी सिंचन करणे सुलभ व्हावे म्हणून याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.