:वाशिम : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह (सीईओ) १२ विभाग प्रमुखांच्या रिक्त पदासंदर्भात पालकमंत्री शंभुराज देसाई आणि राज्याच्या मुख्य सचिवांमध्ये बैठक होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. अद्याप एकाही अधिकाºयाची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली नसल्याने, ही उच्चस्तरीय बैठकही निष्फळ ठरल्याचे तुर्तास तरी दिसून येते. सीईओंसह १२ विभाग प्रमुख आणि पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे.मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. वाशिम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत, वित्त व लेखा, कृषी, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, जिल्हा पाणी व स्वच्छता, रोजगार हमी योजना असे १७ विभाग प्रमुख आहेत. यापैकी कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आरोग्य, जिल्हा पाणी व स्वच्छता या सात विभागाचा अपवाद वगळता उर्वरीत १२ विभागाला कायमस्वरुपी प्रमुख नसल्याने या विभागाचा प्रभार अन्य कार्यरत अधिकाºयांकडे सोपविण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील कारंजाचा अपवाद वगळता उर्वरीत पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी (बीडिओ) नसल्याने कामकाजात खोळंबा निर्माण झाला आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांची ९ सप्टेंबर रोजी बदली झाली. तेव्हापासून येथे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची नियुक्ती झाली नाही. जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वत:सह सर्व पदाधिकारी व सदस्य हे उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा दिला होता. यासंदर्भात पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते.
वाशिम जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा तिढा कायमच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 7:09 PM
Washim Zp सीईओंसह १२ विभाग प्रमुख आणि पाच पंचायत समित्यांना कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे.
ठळक मुद्देसीईओंसह १२ विभागाला प्रमुख केव्हा मिळणार?जिल्हा परिषदेतील कामकाज प्रभावित.