लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील खुल्या प्रवर्गातील विविध रिक्त पदे खात्यांतर्गत बढती प्रक्रियेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नोव्हेंबर महिनाअखेर लेखी परिक्षा घेण्यात येणार असून, एसटी महामंडळाने ३१ आॅक्टोबर रोजीच्या परित्रकान्वये या संदर्भात सुचना दिल्या आहेत.एसटी महामंडळात वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या प्रवर्गाची तसेच सहाय्यक कारागिर, कारागिर ‘क’ प्रमुख कारागीरी या प्रवर्गातील काही पदे रिक्त आहेत. ही पदे खात्यांतर्गत बढतीने भरण्याचे महामंडळाने ठरविले आहे. महामंडळातील प्रचलित कार्यपद्धतीनुसार ही पदे भरण्यात येणार असून, त्या संदर्भातील कार्यवाही विभागीय स्तरावर करण्यासाठी संंबंधित कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी संबंधित विभागाकडून त्यांच्या अख्त्यारीत येणारे आगार व कार्यालयातील रिक्त पदांची यादी तयार करण्यात आली असून, या रिक्त पदानुसार १:८ या प्रमाणा पात्र ठरणाºया कर्मचाºयांची संख्या मध्यवर्ती कार्यालयाकडे १२ नोव्हेंबर रोजी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर अखेर रिक्त पदे बढतीने भरण्यासाठी पात्र कर्मचाºयांची लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रकात दिलेल्या निर्देशांचे बारकाईने निरीक्षण करूनच कार्यवाही करण्यात येत आहे. या निर्देशानुसारच रिक्त पदांची माहिती घेऊन इच्छुक कर्मचाºयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
- चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, अकोला.