वाशिम : जिल्ह्याच्या तापमानाने एप्रिलच्या सुरूवातीला ४० अंश सेल्सीयसपेक्षा अधिकचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमतेवरही परिणाम जाणवत असून जनावर आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, उन्हाळ्यातील आणि त्यानंतर पावसाळ्यातील संभाव्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम पूर्ण गतीने राबविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनावरांना लाळ्या खुरकूत (तोंडखुरी, पायखुरी) या रोगाची लागण साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. देशी आणि संकरित जनावरे यामुळे प्रभावित होतात. या रोगांवरील लस ही लहान जनावरांना प्रथमत: सहा ते आठव्या आठवड्यात दिली जाते. पुढचे लसीकरण दरवर्षी तथा नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत केले जाते. त्यानुसार, सद्या ग्रामीण भागातील जनावरांना ही लस देण्यात येत आहे. काळपुळी हा रोग प्राण्यांमधील अत्यंत घातक असून या रोगाचे लसीकरण फेब्रुवारी ते मे महिन्यात करणे गरजेचे आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात या रोगाचा फारसा प्रसार नाही. गोचीड ज्वर हा आजार जनावरांना उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान होतो. त्यावर नियंत्रणासाठी सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात आली असून सद्याही लसीकरणाची मोहिम राबविण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. संभाव्य आजारांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे दरवर्षी लसीकरण केले जाते. मात्र, नाममात्र १ रुपये शुल्क घेवून केल्या जाणाºया लसीकरणाला पशुपालकांमधून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. जनावरांमध्ये आजारांची लागण झाल्यानंतरच धावपळ केली जाते. हा प्रकार टाळून पशुपालकांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यायला हवे.- डॉ. रवी जाधव, पशुधन विकास अधिकारी, वाशिम
वाशिम जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरण मोहिमेस गती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 3:52 PM
वाशिम : जिल्ह्याच्या तापमानाने एप्रिलच्या सुरूवातीला ४० अंश सेल्सीयसपेक्षा अधिकचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमतेवरही परिणाम जाणवत असून जनावर आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
ठळक मुद्देजनावरांना लाळ्या खुरकूत (तोंडखुरी, पायखुरी) या रोगाची लागण साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते.या रोगांवरील लस ही लहान जनावरांना प्रथमत: सहा ते आठव्या आठवड्यात दिली जाते.काळपुळी हा रोग प्राण्यांमधील अत्यंत घातक असून या रोगाचे लसीकरण फेब्रुवारी ते मे महिन्यात करणे गरजेचे आहे.