कोरोना आजाराने देशभरात थैमान घातले. लाखो नागरिक या आजाराने बाधित झाले, तर हजारोजणांना आपला जीव गमवावा लागला. मागील काही महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून लसीचा शोध लावण्यात आला. जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्रअंतर्गत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचप्रमाणे शिरपूर येथेही ८ मार्चपासून आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. गत तीन दिवसांपासून लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झाले. दरम्यान, सुरुवातीला ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. आता ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लसीकरणाच्या या मोहिमेत एका समुदायातील नागरिकांची उदासीनता दिसून येत असल्याचे समोर येत आहे. ८ मार्चपासून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात ३३५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एका सुमदायातील नागरिकांची संख्या केवळ १० आहे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.
००००
कोट बॉक्स
प्र्त्येक पात्र व्यक्तीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. आजार हा जात, धर्म, पंत, समाज बघत नसतो. यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनी व समाजसेवकांनीही लसीकरणाबाबत जनजागृती करावी.
- डॉ संतोष बोरसे,
तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव
०००
कोट बॉक्स
पात्र व्यक्तीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणाबाबत मनामध्ये कुठलीही शंका व उदासीनता बाळगू नये. लसीकरणामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- शकिलखा पठाण,
पंचायत समिती सदस्य, शिरपूर