तालुक्यातील ग्रामपंचायत ऑपरेटर यांना मानधनविना काम करावे लागत असून त्यांच्या मानधनाच्या प्रश्नावर काेणीही बाेलताना दिसून येत नाही. कारंजा तालुक्यातील ५० ग्रामपंचायत लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हापासून कारंजा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतचे ऑपरेटर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आपल्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीतील गावांमध्ये जाऊन लसीकरण करणाऱ्या नागरिकांची नोंदणी करत आहेत. या ग्रामपंचायतकडून अल्पसे मानधन मिळते. त्यात कोरोनाचे सावट, त्यामुळे सर्वच आर्थिक संकटात आहे. त्यामुळे त्यांना मानधनाची गरज आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तशी तरदूत केली आहे. अशी तरतूद करण्याची मागणी ग्रामपंचायत ऑपरेटर संघटनेचे धनंजय रिठे यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेने अशी केली तरतूद
राष्ट्रीय अभियानांतर्गत कोविड १९ अंतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्या दृष्टीने लस टोचणे ५०० रुपये प्रति दिवस व प्रवास भत्ता २००, कोविड नोंदणी ऑपरेटर मानधन ५०० रुपये व कोविड लसीकरण व्यवस्थापक मानधन अशी तरतूद जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केली.