केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल पंप व एलपीजी गॅस वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून अगोदरच घोषित केले आहे. त्यानुसार, पेट्रोल पंप व गॅस सिलिंडर वितरण कंपनीतील कामगारांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. तसे आदेशही राज्य शासनाच्या वतीने १५ एप्रिल रोजी आरोग्य विभागासाठी काढण्यात आले आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यात तरीही पेट्रोल पंप व गॅस वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे लसीकरण होत असल्याचे दिसत नाही. पेट्रोल पंपात डिझेल व पेट्रोलसाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. होणाऱ्या गर्दीतून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून यापूर्वीच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे लसीकरण करून घेणे गरजेचे होते, तरी पुढील काळात लवकरात लवकर पंपावरील कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करून घेण्यात यावे, अशी मागणी गणेश जाधव या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने केली आहे.
पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचे लसीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:43 AM