या लसीकरणास १ मार्चपासून प्रारंभ झाला असून २ मार्च राेजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही लस घेतली. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष नोंदणी करून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील कोविड - १९ वॉरियर्सचेही लसीकरण या ठिकाणी सुरू आहे. २ मार्चपर्यंत दोनशेच्या वर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. एन. चव्हाण यांनी दिली. तर २ मार्च रोजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही ग्रामीण रुग्णलयात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लसीकरणाच्या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. ही लस सुरक्षित असून सर्वांनी नोंदणी करून लस घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी वैध्यकीय अधीक्षक डॉ. एल. एन. चव्हाण,डॉ. रमेश आडे, सेविका सविता उबाळे, शरद गावंडे, प्रकाश संगत ,जावेद अली फारुखी आदींची उपस्थिती होती.
जेष्ठ नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:18 AM