काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाच्या वतीने विविध खबरदारी घेतल्या जात असून काेराेनाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. आधी शहरातील व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी करुन घेतल्यानंतर आता शहरातील ४५ ते ६० वर्षीय इसमांचे लसीकरण शहरातील एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये सुरु करण्यात आले आहे. ३१ मार्च राेजी सुरु झालेल्या लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. उद्या १ एप्रिल राेजी सुद्धा लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे, नगराध्यक्ष अशाेक हेडा, उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ऊर्फ बापू ठाकूर यांनी केले आहे.
..............
जिल्ह्यात वाढती काेराेना बाधितांची संख्या पाहता प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात आहेत. वाशिम शहरातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. काेराेना नियमांचे पालन करीत सर्व नागरिकांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी करू नये.
-दीपक माेरे
मुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद , वाशिम