लोकमत न्यूज नेटवर्ककांरजा लाड: तालुक्यातील४९ ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, यासाठी मतदान होणार असलेल्या १५४ मतदान केंद्रांपैकी ३ मतदान केंद्र अ ितसंवेदनशील असल्याचे प्रशासनाकडून ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. कारंजा तालुक्यात ४९ ग्रामपंचायत मधील ४९ सरपंच पदासाठी तर २२२ सदस्यांच्या निवडीसाठी ७ ऑक्टोबर रोजी तालुक्या तील १५४ मतदान केंद्रावर मतदान प्रकीया पार पडणार आहे. मदतान प्रकीया शांततेत पार पडावी यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी डॉ शरद जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्न ाकर नवल, ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या मार्गदशनाखाली १७0 पथकासह १५00 महसूल व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही मतदान केंद्र अति संवेदनशिल तर काही संवेदनशील म्हणून घोषीत केले आहे. या पृष्ठभूमीवर संबंधित मतदान केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत पसरणी, आखतवाडा, महागाव या तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे, तर संवेदनशील मतदान केंद्रांत मनभा, पोहा, बांबर्डा, पारवा कोहर, काडशिवणी, मोखड पिंप्री, काकडशिवणी, डोंगरगाव, पारवा कोहर, ब्राम्हणवाडा, दोनद बु., म्हसला, कामठा, विळेगाव, लोणी अरब या ठिकाणच्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात १५४ मतदान केंद्रावर प्रत्येकी ५ प्रमाणे १५00 महसुल व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. ५३ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत वडगाव इजारा, तारखेडा, लोहगाव या ग्राम पंचाय ती अविरोध निवडून आल्यात. एक ग्राम पंचायतच्या सरपच पदाची जागा रिक्त आहे. त्यामुळे ४९ सरपंच पदाच्या जागेसाठी १८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, ३९७ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार होती. यामधे १६५ सदस्य अविरोध निवडून आले, तर १0 रिक्त असून २२२ सदस्यांच्या जागेसाठी निवडणुक होणार आहे. सदस्य पदाच्या निवडणुक करीता ६६६ उमेदवार निवडणुक रिंगणात असून यासाठी ७ ऑक्टोबर रोजी १५४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यापैकी काही मतदान केंद्र अति संवेदनशील व संवेदनशील म्हणुन निवडणुक आयोगाने घोषीत केले. मतदान प्रकीया पार पडल्यानंतर ९ ऑ क्टोबर रोजी शेतकरी निवास मंगरूळपीर रोड कारंजा येथे ११ फे-यामध्ये मतमोजनीच्या कार्यक्रमास सुरवात होणार आहे.
४९ सरपंच पदासाठी १८१ अर्जकारंजातील ५४ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत वडगाव इजारा, तारखेडा, लोहगाव या ग्राम पंचाय ती अविरोध निवडून आल्यात. एक ग्राम पंचायतच्या सरपच पदाची जागा रिक्त आहे. आता उर्वरितत ४९ सरपंच पदाच्या जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच पदाची निवड प्रथमच थेट मतदारांकडून होणार असल्याने या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेतेही या निवडणुकीबाबत उत्सूक असल्याचे दिसत आहे.