मंगरूळपीर : येथील लसीकरण केंद्र, ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर येथे ६ मे २०२१ रोजी चितलांगे गॅस एजन्सी मंगरूळपीरतर्फे आयोजित पाणी कॅनची पाणपोई, तसेच सॅनिटायझर मशीनचा शुभारंभ व मास्क वाटप व ग्रामीण रुग्णालयाच्या नर्सचा आरोग्य किट व बुके देऊन चितलांगे इण्डेन गॅसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरलाल बजाज जीवन गौरव समितीतर्फे नरेंद्र बजाज व चितलांगे इण्डेन गॅस एजन्सीतर्फे कोविड रुग्णाला मागणीनुसार घरपोच भोजन डबा देण्याच्या कार्यक्रमाचासुद्धा शुभारंभ मंगरूळपीरचे विभागीय अधिकारी सखाराम मुळे यांचा हस्ते करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक लक्ष्मण चव्हाण, विद्युत मंडळाचे अभियंता जांभळूणकर, प्रा. वीरेंद्रसीह ठाकूर, डॉ. जयंत पिंपरकर, भाऊराव व्यवहारे, डॉ. अजमल खान, डॉ. नंदकिशोर बियाणी, प्रा. सुधीर घोडचर, सचिन कुलकणी हे मंचकावर उपस्थित होते. कोविडच्या या अतिशय संघर्षमय कालावधीत चितलांगे व बजाज, तसेच त्यांच्या मित्र परिवाराने एका सामाजिक उपक्रमात जे काही भरीव योगदान दिले आहे व देत आहेत, त्यापासून खरोखरच प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय अधिकारी मुळे यांनी केले. याप्रसंगी पांगरीसारख्या दुर्गम गावात तलावाचे मोठे काम १५ दिवसांत पूर्ण करून घेतल्याबद्दल सचिन कुलकर्णी यांचे एस.डी.ओ. मुळे यांनी स्वागत केले. सर्व मंचकावरील उपस्थित मान्यवरांना उमेश नावंदर, किशोर भुतडा, हरीशभाऊ बाहेती, नगरसेवक सचिन पवार, राजेश जाखोटिया, लोहिया, विनोद डेरे, नीलेश राठोड, प्रकाश संगत आदींनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम चितलांगे यांनी, तर प्रास्ताविक नरेंद्र बजाज यांनी केले. आभार कविता जाखोटिया यांनी मानले.
शंकरलाल बजाज स्मृतिप्रीत्यर्थ विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:42 AM