प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा पिवळा शेला व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विश्वनाथ शिकारे, अफ्रोट संघटनेचे मानोरा तालुकाध्यक्ष प्रा. बंडू भाऊ वाघमारे यांनी जागतिक दिन व आदिवासी संस्कृती, निसर्गपूजन यांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. आदिवासी गौरव दिनाची माहिती आनंद खुळे, विशाल डोलारकर, विकास लडके, ज्ञानेश्वर ढगे यांनी दिली.
नंतर शाळेतील, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना उजळणी, बालचित्र पुस्तक, रजिस्टर व पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर मुंगसाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वितेसाठी अभ्यासिकेचे विद्यार्थी व तरुण मंडळाने परिश्रम घेतले. आकाश बेले यांनी सूत्रसंचालन, तर प्रकाश खुळे यांनी आभार प्रदर्शन केले.