बोराळा: या गावचे घरणामुळे पुनर्वसन झालेले आहे. या गावाचा विकास केल्यास गावाचे नंदवनवन होवू शकते परंतु या गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. विविध समस्यांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत. संबधितांना निवेदने देवूनही काहीच फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.या गावामध्ये कीत्येक वर्षापासून गावच्या विकासाच्या दृष्टीने एकही काम झालेले नाही . गावामध्ये स्मशान भुमीची व्यवस्था नसल्याने गावात एखादयाचे निधन झाल्यास त्या व्यक्तिच्या शवाला रस्त्याच्या कडेला अंत्यविधीचा कार्यक्रम उरकावा लागतो , परंतु पावसाळयाच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र संबधितांना याचे काही देणे घेणे दिसून येत नाही. गावामध्ये धरण असल्यामुळे पाणी पुरवठयाच्या विहीरीला चांगल्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे परंतु अयोग्य पाणी वाटपामुळे गावातील लोकाना दह ादिवसाला एकवेळा पाणी मिळते. पाण्याच्या टाकीजवळ गावातील काही जणांनी केरकचरा, गुरांचे शेण व इतर अडगळीत साहीत्य टाकले आहे. यामुळे पाण्याच्या टाकीजवळ घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात पाणी असून सुद्धा पावसाळयात सुध्दा योग्य नियोजनाअभावी २ किमी वरुन पिण्याचे पाणी आणावे लागते कित्येक वर्षापासून पाईपलाईन फुटलेली असून सुध्दा दुरूस्त करण्यात आली नाही. गावातील खांबावर दोन वर्षापासून पथदिवे नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या परिसरामध्ये खुप घान साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन घेण्यास विद्यार्थ्याच्या पालकांची यामुळे नाराजी दिसून येत आहे. याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी व सीओ यांना निवेदनाव्दारे कळविले आहे मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही . तरी याकडे लक्ष देण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व गावकर्यातर्फे करण्यात येत आहे.
बोराळा येथे विविध समस्या, ग्रामस्थ त्रस्त
By admin | Published: June 17, 2014 8:00 PM