येथील गट सर्वे क्र.१३५ मध्ये अतिक्रमण जागेवर गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ३५ घरांची वस्ती आहे.यात जवळपास ६० ते ७० रहिवाशी राहत आहे.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांनी सदर अतिक्रमण जागेवर लेआऊट पाडून त्या जागा आमच्या नावे करण्यात यावेत, येण्याजाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही प्रतिसाद शासनाकडून मिळाला नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे.याबाबत ग्रामपंच्यात प्रशासन , तहसीलदार धिरज मांजरे यांना निवेदन दिले आहे.
याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना एक किमी अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते .त्यामुळे येथे हातपंपाची व्यवस्था करावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे .सदर वस्ती हि गावाबाहेर असून या वस्तीच्या आजूबाजूने मोठ्याप्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. त्यामुळे विंचू , साप, गोम यांची भीती येथे राहणाऱ्या नागरिकांना वाटत आहे. याविषयी अनेकदा ग्रामपंचत धनज बु येथील सरपंच , तहसीलदार कारंजा, उपविभागीय अधिकारी कारंजा, गटविकास अधिकारी कारंजा, पंचायत समिती सभापती कारंजा, जिल्हाधिकारी कार्यलाय वाशिम, व तसेच आमदार पाटणी यांना निवेदन दिले आहे. याकडे संबधितांनी त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी माणगी येथील रहिवाशी करत आहे .
....
आम्हा अतिक्रमणधारकांना सदर जागा नावावर करून दयावी तसेच येथे रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावर लाईट या आमच्या समस्या असून त्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी अनेकदा शासनाकडे करून सुद्धा आम्हाला अध्यापपर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही आहे.
- विशाल अघमे,
रहिवाशी दलीतवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी , धनज बु
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अनेक समस्येने त्रस्त झालो असून शासनाकडे आमच्या या समस्येविषयी कित्येकदा माहिती देऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही.
- विपुल घणघावकार
राहिवाशी, दलीतवस्ती रमाबाई आंबेडकर कॉलनी ,धनज बु