लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त १ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रम पडले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी तर जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्तदेखील कार्यक्रम घेण्यात आला. शासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयादेखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. रिसोड येथील महात्मा गांधी नगर परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यपक रामेश्वर जायभाये तर प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद वाचनालयाचे संचालक कमलाकर टेमधरे हे होते. अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुजन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहीती सांगितली.
वाशिम जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:24 PM