लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत १ जानेवारीपासून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात विविध कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. यामध्ये परिसंवाद, व्याख्याने व कवी संमेलन आदी कार्यक्रमांचा समावेश असून जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्र. ५ येथे दुपारी २ ते ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत.जिल्हा न्यायालयात १ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ‘मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजातील वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अनिल कावरखे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, वाशिमचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत १५ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्हा न्यायालयात विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 5:06 PM