रक्ताचा तुटवडा असल्यामुळे गंभीर आजारातील रुग्णांना रक्ताची गरज पाहता शिवसेनेतर्फे सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले; तसेच स्थानिक लाखाळा माउली हॉस्पिटल येथे मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मोहन अमृता गोरे यांनी गरजू रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला. दरम्यान, शहरातील २५ ते ३० महिलांनी व २५ युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून महिला व युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरात शिवसेनेच्या नवीन शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, पांडुरंग पांढरे, बाळू माल, बालाजी वानखेडे, राजाभैया पवार, अकीलभाई, रामकृष्ण माउली, माजी पंचायत समिती सदस्य आशा अमृता गोरे, पंचायत समिती सदस्य गजानन भुरभुरे, गोपाल लव्हारे, मारोती मालस, नारायण ठेंगडे, दिलीप शिंदे, संतोष गावंडे, जगन कापसे, डॉ. विवेक गुल्हाने, सुरेश उगले, श्याम ठाकूर, संजू शर्मा, शिवम घुगे, पंढरी गायकवाड, महेश खोटे, चंदन धोंगडे, ज्ञानेश्वर गोरे, गजानन मुसळे, केतन खोटे, राजेश वानखेडे, राजू कदम, पिंटू माल, जनार्दन कदम, राम राजगुरू, रितेश गाडेकर, पद्माकर माल, शंकर शिंदे, गजानन निरगुडे, परमेश्वर सावके, दत्ता भारती, मुरलीधर निरगुडे, प्रवीण सारडा, कृष्णा सारडा, विठ्ठल ठाकरे, संतोष आरू, सुनील चव्हाण, महेंद्र सावंत, आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:44 AM