मालेगाव येथील वसुंधरा टीमच्या अर्चना मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मंत्री यांनी वटसावित्रीचे महत्त्व विषद केले, तसेच एक व्यक्ती एक झाड उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना वडासह अनेक झाडांचे वाटप यावेळी करून ते जगविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी वसुंधरा टीमसह परिसरातील महिलांची उपस्थिती लाभली हाेती.
मंगरुळपीर : तालुक्यासह शहरात स्त्रियांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी वटवृक्षाचे पूजन करून महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले. वटपौर्णिमा सणाला स्त्रियांमध्ये एक वेगळेच महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळावे, यासाठी व्रत करतात. उपवास करून वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात. या वर्षीही महिलांनी हा सण साजरा केला.
.................
वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण
भर जहागिर : शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मोपचे वृक्षप्रेमी प्राचार्य गजानन मुलंगे यांच्या कल्पनेतून सीमा मुलंगे, प्रेरणा टेमधरे, अश्विनी मोरे यांच्या हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपण करून हा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पी.के. चोपडे, प्रमुख उपस्थितीमध्ये रवींद्र आढाव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यनारायण फुके, प्रमुख पाहुणे वृक्षप्रेमी प्राचार्य गजानन मुलंगे, प्रा.शरद टेमधरे, प्रा.शंतनु मोरे, प्रा.नीलेश पुंड हे होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष, पिंपळाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य मुलंगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वड, पिंपळ वृक्षाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रा.पंढरीनाथ चोपडे, प्रा.श्रीकांत काळदाते, रवींद्र फुके, विनोद जायभाये, संदीप भालेकर, दत्ता बोडखे, तान्हाजी मोहिते, परसराम भोसले, ज्ञानेश्वर काळदाते, विशाल गरकळ, गजानन जीवने, मदन कांबळे, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.
............
वाशिम येथे महिलांना वटवृक्षांचे वाटप
वाशिम : वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्थानिक नारायणबाबा मंदिर परिसरात नारी शक्ती, बेटी बचाओ, बेटी पढाओ व नैसर्गिक पर्यावरण संसाधन विकास, वाशिम महिला ग्रुपच्या वतीने महिलांना वटवृक्ष वाटप करण्यात आले, तसेच त्याचे संगोपन करण्याचे आवाहन सहयोग फाउंडेशन, नारी शक्ती, बेटी बचाओ, बेटी पढाओ व नैसर्गिक पर्यावरण संसाधन विकास, वाशिम जिल्हाध्यक्षा संगीताताई वसंत इंगोले यांनी केले. यावेळी अमरजीत कौर कपूर, हेमा सोमानी, सोनाली गर्जे, दीपा वानखडे, छाया मडके, ज्योती छापरवाल, ज्योती चरखा, नयन मुंदड़ा, भावना सुतवणे, वृषाली टेकाडे, ज्याेती चरखा आदी उपस्थित हाेते.