वाशिम, दि. २३- पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व २६ मार्च २0१७ रोजी 'वत्सगुल्म पर्यटन महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, ह्यएमटीडीसीह्णचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत सवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, पोलीस उपअधीक्षक धात्रक, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन 'वत्सगुल्म महोत्सव' अंतर्गत करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणार्या या महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक पर्यटन क्षेत्रांची एकदिवसीय सहल, अँडव्हेंचर स्पोर्टस्, शास्त्रीय संगीत व लोकसंगीताचे कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
वाशिम येथे २५ मार्चपासून ‘वत्सगुल्म पर्यटन महोत्सव’!
By admin | Published: February 24, 2017 1:57 AM