संतोष वानखडे / वाशिम: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातूनच रब्बी हंगामात जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ झाली. यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय निर्माण केला. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेनासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघ त आहे. ्रपारंपरिक पिकांबरोबरच फळबाग, भाजीपाला आदी उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच रब्बी हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २0११-१२ मध्ये जिल्ह्यातील १३६४ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यामध्ये सर्वाधिक लागवड वाशिम तालुक्यात ३२२ हेक्टर तर त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात ३0५ आणि सर्वात कमी कारंजा तालु क्यात ११८ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१२-१३ मध्ये भाजी पाल्याखालील लागवड क्षेत्रफळात वाढ होऊन ते २१३0 हेक्टरवर पोहोचले. वाशिम तालुक्यात ५00 व मंगरुळपीर तालुक्यात ४५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१४-१५ मध्ये २२२५ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यावर्षी वाशिम तालुक्यात भाजीपाला लागवडीचे क्षेत्रफळ घटले आणि मानोरा तालुक्यात अनपेक्षित भाजीपाल्याखालील क्षेत्रफळात वाढ झाली. मानोरा तालुक्यात ४१0 हेक्टरवर तर वाशिम व रिसोड तालुक्यात प्रत्येकी ३५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१५-१६ या वर्षात २५00 हेक्टरवर भाजीपाला लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला; मात्र यावर्षीचा अल्प पाऊस आणि नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे फारसे धजावत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येते. सध्या १४00 हेक्टरपर्यंत भाजीपाला लागवड झाली आहे. पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसणे, काही ठिकाणी जलसाठय़ातील घट, विद्युत रोहित्र नादुरूस्त, जादा भारनियमन आदी कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, यावर्षी भाजीपाला लागवड स्थिर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यात सर्वात कमी तर वाशिम तालुक्यात सर्वात जास्त भाजीपाला लागवड होत असल्याचे आकडेवारी सांगते. कारंजा तालुक्यात ५८0, मालेगाव तालुका ७६८, मंगरुळपीर तालुका ११0५, मानोरा तालुका १0८९, रिसोड तालुका ८६१ आणि वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११७२ हे क्टरवर गत तीन वर्षात भाजीपाला लागवड झाली.
*यावर्षी संकट
दरवर्षी भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून ये ते. यावर्षी विविध कारणांमुळे भाजीपाल्याचे क्षेत्रफळ स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न शे तकरी करीत आहेत. शेतकर्यांसाठी भाजीपाल्याची बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे. यामुळे भाजीपाल्याचा चांगला बाजारभाव मिळू शकेल, यात शंका नाही.