................
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : आगामी खरीप हंगामाकरिता शेती सज्ज ठेवावी लागणार आहे. त्यानुषंगाने ट्रॅक्टरव्दारे मशागतीची कामे करावी लागणार आहेत; मात्र डिझेलचे दर वाढल्याने शेतकरी संकटात सापडले असून दर कमी करण्याची मागणी होत आहे.
.............
गावठाण सर्वेक्षण कामास ‘ब्रेक’
वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले; मात्र कोरोना संकटामुळे त्यास ‘ब्रेक’ लागला आहे.
...............
वाशिममध्ये ४७ रुग्ण पॉझिटिव्ह
वाशिम : शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार शहरात विविध ठिकाणचे ४७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धोका वाढत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................
जिल्हा कचेरीत पाण्याचा अभाव
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
..................
प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन
वाशिम : एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी म्हणून तोंडाला सदोदित ‘मास्क’चा वापर करावा. यासह एस.टी.त चढताना व उतरताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळावे, असे आवाहन आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले आहे.
..............
वाहतूक विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : पाटणी चौक व रिसोड नाका येथे दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळित होत आहे. यामुळे विशेषत: पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी गणेश गोरे यांनी शुक्रवारी पोलिसांकडे केली.
..............
अतिक्रमण प्रस्ताव नियमानुकूल करा
वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे केली.
..................
पांदण रस्त्याच्या कामास प्रारंभ
मानोरा : आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून बोरव्हा ईजारा येथे दोन पांदण रस्ते मंजूर झाले. या कामास १३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, माजी अध्यक्ष निळकंठ पाटील, सरपंच सुधाकर चौधरी, राजेश राठोड, उपसरपंच भारत राठोड, पोलीस पाटील राजू गावंडे, डॉ. अर्जुन राठोड, प्रकाश राठोड, संदिप साखरकर, बाळू राठोड उपस्थित होते.
............................
नाली स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर पालिकेने नाल्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने शनिवारी आरोग्य पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.