0000
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील शुक्रवारपेठ परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एकबुर्जी जलाशयात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने तांत्रिक कारणांमुळे उद्भवलेली ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.
000
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
वाशिम : तलाठी, वैद्यकीय कर्मचारी, ग्रामसेवक, पशुधन विभागातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी आसाराम काळे यांनी तहसीलदारांकडे बुधवारी केली.
000
मालेगाव येथील वाहतूक विस्कळीत
मालेगाव : येथील पोलीस स्टेशनसमोरील बसथांब्यावर ऑटोचालक त्यांची वाहने कुठेही थांबवितात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
000
वीज देयक वसुलीस स्थगिती द्यावी
वाशिम : कोरोनाच्या काळात अनेक नागरिकांचा लघु व्यवसाय ठप्प झाला. अद्यापही हे व्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेले नाहीत. त्यातच पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू केला. शेतकऱ्यांनाही विविध संकटांचा सामना करावा लागला. महावितरणकडून थकीत वसुलीसाठी वीजजोडणी खंडित केली जात आहे. याला स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
00
सौर कृषिपंप योजना थंडबस्त्यात
वाशिम : महावितरणकडून राबविण्यात येणारी सौर कृषिपंप योजना गेल्या काही दिवसांपासून थंडबस्त्यात सापडली आहे. सौर कृषिपंपांकरिता अर्ज करूनही अनेकांना पंप मिळाले नाही. या मोहिमेस गती देऊन सौर कृषिपंप वाटपाचे प्रमाण वाढविण्याची मागणी होत आहे.
000
वृक्ष तोडणांऱ्यावर कारवाईची मागणी
वाशिम : रस्त्याच्या दुतर्फा असलेली वृक्षाच्या बुंध्याला आग लावून वृक्षतोड करण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढीस लागत आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमी अभिजीत जोशी यांनी सोमवारी केली.
00
देपूळ येथे सांडपाणी व्यवस्थापन
वाशिम : देपूळ ग्रामपंचायतने ऑपरेशन सांडपाणी ही मोहीम हाती घेतली असून, ग्रामपंचायतने गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही कडेला नाल्याांची निर्मिती करून गावातील सांडपाणी व्यवस्थित बाहेर काढले आहे. त्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी बंद झाले आहे.
00
ग्रामीण रुग्णालयात सुविधांची मागणी
वाशिम : अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांना पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय उपलब्ध नाही. याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.
00
तोंडगाव येथे आणखी ८ कोरोना रुग्ण
वाशिम : तोंडगाव येथे आणखी ८ कोरोना रुग्ण असल्याचे १४ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. यापूवीर्देखील तोंडगाव येथे कोरोना रुग्ण आढळून आले होते. नागरिकांनी ‘कोविड-१९’च्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.
00
वनोजा फाट्यावरील हातपंप बंद
वाशिम : शेलूबाजार येथून जवळच असलेल्या वनोजा येथील फाट्यावरील हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी आहे